bank of maharashtra

“भारताविरुद्ध आपल्या भूमीचा वापर होऊ देणार नाही” – अमीर खान मुत्ताकी

0

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताच्या दौऱ्यावर असताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी भेट घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अफगाणिस्तान कधीही भारताविरुद्ध आपल्या भूमीचा वापर होऊ देणार नाही. मुत्ताकी यांनी भारताशी असलेल्या मैत्रीचे कौतुक करताना म्हटले की, भारताने प्रत्येक कठीण काळात अफगाणिस्तानला साथ दिली आहे. दोन्ही देशांमधील संबंध आपसी सन्मान व व्यापारावर आधारित असावेत, असेही त्यांनी नमूद केले. तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतर मुत्ताकी यांचा भारतातील हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. त्यांनी आज भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी त्यांनी म्हटले की, “भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात नेहमीच मैत्रीचे संबंध राहतील.”

खरंतर, शुक्रवारी दिल्लीत झालेल्या चर्चेदरम्यान मुत्ताकी यांनी स्पष्ट केलं की, “इस्लामिक अमीरात कोणत्याही शक्तीला इतर देशांविरुद्ध अफगाण भूभागाचा वापर करण्याची परवानगी देणार नाही.एस. जयशंकर यांच्याशी भेटीनंतर मुत्ताकी यांनी भारताचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “अफगाणिस्तानने कधीही भारताविरोधात वक्तव्य केले नाही, आणि नेहमी भारतासोबत सद्भावनायुक्त संबंध ठेवले आहेत.” अफगाणिस्तान आपसी सन्मान, व्यापार व लोकांमधील सहकार्यावर आधारित संबंध इच्छितो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पार पडलेल्या द्विपक्षीय बैठकीच्या सुरुवातीला मुत्ताकी म्हणाले की, अफगाणिस्तान आपल्या भूमीचा वापर कधीही इतरांच्या विरोधात होऊ देणार नाही. अमेरिकेच्या कब्जादरम्यान अनेक चढ-उतार आले.

त्या काळातही आम्ही कधी भारताविरुद्ध वक्तव्य केले नाही. उलट आम्ही भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मुत्ताकी यांनी आपल्या भाषणात भारत-अफगाणिस्तान मैत्रीचे भरभरून कौतुक केले. कोणत्याही संकटाच्या वेळी भारत नेहमीच अफगाणिस्तानच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी भूकंप झाल्यावर भारत हा सर्वात पहिला देश होता ज्याने मानवतावादी मदतीसाठी तत्काळ प्रतिसाद दिला.” त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, अफगाणिस्तान भारताला एक घनिष्ठ मित्र म्हणून पाहतो. याच वर्षी जानेवारी महिन्यात दुबईमध्ये भारताचे परराष्ट्र सचिव विक्राम मिस्री यांच्यासह इतर अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीचाही त्यांनी उल्लेख केला. मुत्ताकी म्हणाले, “आपले संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नाहीत, तर व्यवसाय, संस्कृती, क्रीडा आणि इतर क्षेत्रांतील सहकार्यामुळे आपला संबंध आणखी दृढ झाला आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech