bank of maharashtra

महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन…!, पंढरपूर नगरपरिषद मधील बंद पडलेल्या धुळ मशीनचे पूजन

0

पंढरपूर : पंढरपूर शहरामध्ये रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे व रस्त्याच्या दुरावस्त्यामुळे वाहनांच्या रहदारीने रस्त्यावरील धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडत असल्यामुळे  या धुळीमुळे लहान बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवकांमध्ये श्वसनाचे आजार, खोकला, सर्दी अशा प्रकारे आजार वाढत आहेत. तरी नगरपालिका प्रशासन कुठलीही कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे आज आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद यांच्या बंद पडलेल्या धूळ मशीनचे पूजन करून आंदोलन केले हे आंदोलन झोपलेल्या नगरपालिका प्रशासनाला सद्बुद्धी देण्यासाठी करण्यात आले, अशी माहिती यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली.

गत सहा ते सात वर्षांपूर्वी पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांनी लाखो रुपये खर्चून पंढरपूर शहर धूळ मुक्त करण्यासाठी स्वीपर मशीन खरेदी केले ते मशीन बंद पडलेली आहे, तरीही प्रशासनाचा भोंगळ कारभार असून आज पंढरपूर मध्ये वाढत्या धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या धुळीमुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार होत असून नाका तोंडात धुळ जात आहे व काही नागरिकांच्या छातीमध्ये व अन्ननलिकेमध्ये धूळ जाऊन चिखल तयार झालेल्या घटना घडताना दिसून येत आहेत.

बंद पडलेल्या मशिन पुन्हा चालू करण्यासाठी प्रशासन जागृत नसल्याने कोणत्याही प्रकारे उपायोजना करताना दिसत नाही. त्यामुळे महर्षी वाल्मिकी संघांने गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करत या धुळखात पडलेल्या मशिनीची पुजा पार पाडली असे यावेळी गणेश अंकुशराव यांनी सांगितले. यावेळी बबलू बोराळकर, सुरज कांबळे, जयवंत अभंगराव, सुनील भाळवणकर, ओमकार परचंडे, आश्विन बुरले, नितीन म्हेत्रे, अण्णा अधटराव, आप्पा करकमकर, अक्षय म्हेत्रे, हनुमंत कोरे, स्वप्निल मोरे, माऊली कोळी, वैभव कांबळे, कृष्णा माने आदी समाज बांधव उपस्थित होते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech