नवी दिल्ली : अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर यशस्वीपणे परतल्याबद्दल आज, बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन ठराव मंजुर करण्यात आला. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी अंतराळ प्रवासातून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे पृथ्वीवर यशस्वीरित्या परतल्याबद्दल कौतुक केले आणि या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इस्रोमधील संपूर्ण शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या टीमचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की त्यांची निष्ठा, कठोर परिश्रम आणि चिकाटीमुळे हे स्वप्न साकार झाले.केंद्रीय मंत्री म्हणाले की, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील १८ दिवसांचे ऐतिहासिक अभियान पूर्ण केले. हे अभियान २५ जून २०२५ रोजी सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला मिशन
पायलट म्हणून सामील झाले होते. या मोहिमेद्वारे, पहिल्यांदाच एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेला. हा भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील एक नवीन अध्याय आहे. अंतराळात भारताचे हे एक मोठे उड्डाण आहे आणि आपल्या अंतराळ कार्यक्रमाच्या भविष्याची सोनेरी झलक देते. अश्विनी वैष्णव म्हणाले की, “गगनयान मोहिमेद्वारे भारत येणाऱ्या काळात आणखी मोठ्या उद्दिष्टांकडे पाहत आहे. आम्ही भारतीय अंतराळ स्थानक असण्याचा संकल्पही केला आहे. शुभंशु शुक्ला यांच्या मोहिमेच्या या यशामुळे भारत या उद्दिष्टांच्या एक पाऊल जवळ आला आहे. भारत आता मानवी अंतराळ मोहिमेतील प्रमुख शक्तींपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि निर्णायक नेतृत्वाचे मंत्रिमंडळ कौतुक करते. त्यांची दूरदृष्टी, भारताच्या अंतराळ क्षमतांवरील त्यांचा अढळ विश्वास आणि त्यांचे मार्गदर्शन यामुळे भारत या टप्प्यावर पोहोचला आहे. गगनयान मोहिमेद्वारे भारत येणाऱ्या काळात आणखी मोठ्या उद्दिष्टांकडे पाहत आहे. आम्ही भारतीय अंतराळ स्थानक असण्याचा संकल्पही केला आहे. शुभंशु शुक्ला यांच्या मोहिमेच्या या यशामुळे भारत या उद्दिष्टांच्या एक पाऊल जवळ आला आहे. भारत आता मानवी अंतराळ मोहिमेतील प्रमुख शक्तींपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि निर्णायक नेतृत्वाचे मंत्रिमंडळ कौतुक करते. त्यांची दूरदृष्टी, भारताच्या अंतराळ क्षमतांवरील त्यांचा अढळ विश्वास आणि त्यांचेमार्गदर्शन यामुळे भारत या टप्प्यावर पोहोचल्याचे वैष्णव यांनी सांगितले.