bank of maharashtra

बीड खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे – उज्वल निकम

0

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले की, आज आरोप निश्चित केले आहेत. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला. पुढील ८ जानेवारी रोजी होईल. आजही आरोपी वकिलांनी या खटल्यात डी फॉर डीले आणि डी फोर डीरेल केले गेले.प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच तीच कारणे न्यायालयात मांडली जात होती. त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली. खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं उज्वल निकम यांनी सांगितले.

९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ढवळून निघाले होते. सुदर्शन घुले, जयराम चाटे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या सहा आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात नेले. या ठिकाणापासून एका बाजूला सुदर्शन घुलेचे शेत आहे. त्याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केली. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. १५ व्हिडीओ आणि ८ फोटो आरोपीकडे मिळाल्याची नोंद आहे.

या व्हीडिओत ते आरोपी प्रत्यक्ष मारताना आणि आनंद साजरा करताना दिसत आहेत. हे फोटो जेव्हा पहिल्यांदा माध्यमांमध्ये आले आणि सोशल मीडियावर आले तेव्हा राज्यात संतापाची लाट उसळली होती. १२ मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली होती. पोलिसांनी न्यायालयात १८०० पानांचे चार्जशीट सादर केले होते. त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले? याचे तपशील दिले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. नंतर अटकसत्र सुरू झाले होते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech