bank of maharashtra

श्री अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेसाठी दोन दिवस दर्शन बंद

0

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सोमवार दि. ११ व मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी सुरु राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन होणार नसल्याने कलश व उत्सव मूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवून भाविकांना योग्य पद्धतीने दर्शनाची सोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहणेच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांचे वतीने मूर्तीची पाहणी करणेकामी वेळोवेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली (भारत सरकार) यांना कळविण्यात आले होते.

त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली यांचे कडून मूर्तीची पाहणी व संवर्धन १६ एप्रिल २०२४ मध्ये करणेत आली होते. त्यावेळेच्या सुचनेनुसार देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने याबाबतचे पत्र दि. १२ जून रोजी महासंचालक भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली (भारत सरकार) यांना मूर्तीचे नियमित पाहणी व आवश्यक संवर्धन प्रक्रिया करणेबाबत कळवले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग यांचे वतीने श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी व आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे.

त्यामुळे श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ व पासून ते मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत भाविकांना घेता येणार नाही, या कालावधीमध्ये भाविकांना श्रीं ची उत्सवमूर्ती व श्रीकलश दर्शनासाठी ठेवणेत येणार असून, भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांना सहकार्य करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech