संगमनेर : ठाकरे बंधूच्या युतीचा कोणताही परीणाम मुंबईसह राज्यात कुठेही होणार नाही. जनतेला नव्हे तर फक्त एकमेकांच्या आधारासाठी एकत्र आले आहेत. मराठी माणूसच त्यांना हद्दपार करील.दोघांच्या एकत्र येण्याचा कोणताही परीणाम महायुतीवर होणार नसल्याचे परखड मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, दोघा भावांची युती ही त्यांची गरज आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाही.त्यांच्या काळातच मराठी माणूस उध्वस्त झाला असल्याकडे लक्ष वेधून लोकांचा पूर्ण विश्वास महायुतीवर आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये ज्या वेगाने विकासाची प्रक्रीया पुढे जात आहे त्याला मुंबईची जनता निश्चित साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अहील्यानगर महापालिका निवडणुकीत आमची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल.जागा वाटपाचा फाॅर्म्यूला निश्चित करतोय.विरोधकांकडे आज उमेदवार नाहीत त्यांच्याकडे उमेदवारी मागायला कोणी जायला तयार नाही. ज्यांना डावलेले जाईल तेच विरोधकांचे उमेदवार असतील आशी टिपणी मंत्री विखे पाटील यांनी केली.
ज्यांनी स्वताच्या तालुक्यात काॅग्रेस पक्षाला तिलांजली दिली तेच पक्षाचे आता स्टार प्रचारक झाले याचे आश्चर्य वाटते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती बरोबर राहाणेच उचित ठरेल. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे तंतोतंत पालन झाले पाहीजे. मतदारांच्या रंगीत फोटोसह नावांच्या याद्या समाज माध्यमांवर प्रसिध्द होत असतील तर ते गंभीर गंभीर आहे.महायुतीच्या कार्यकर्त्यानी आयोगाच्या नियमांचे पालन केले पाहीजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
