bank of maharashtra

नाशिकच्या आकाशात झेपावले तेजस एमके-१ए

0

नाशिक : भारताचे स्वदेशी लढाऊ विमान तेजस एमके१ ए ने आज आपल्या इतिहासातील पहिले उड्डाण केले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) नाशिक येथील एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनमधून हे पहिले उड्डाण पार पडले. या वेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. याच वेळी एलसीए तेजस एमके१ ए ची तिसरी उत्पादन यंत्रणा (प्रोडक्शन लाईन) सुरू करण्यात आली. हे भारतात लढाऊ विमान निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पहिल्या ऐतिहासीक उड्डाणापूर्वीच गुरुवारी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एचएएलच्या ‘मिनी स्मार्ट टाउनशिप’ प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि त्यांचे सतत विकासासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी एचएएलच्या या मॉडेलला इतर उद्योगांसाठी एक बेंचमार्क (दृष्टीसंपन्न आदर्श) ठरवण्याची क्षमता असल्याचे म्हटले. त्यांनी एचएएल परिवाराचे या दिशेतील प्रयत्नांसाठी अभिनंदनही केले. राजनाथ सिंह म्हणाले, “संपूर्ण जग आज पर्यावरण संवर्धनाची गरज व्यक्त करत आहे, आणि अशा काळात एचएएलने त्यांच्या टाउनशिपच्या माध्यमातून एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech