माईस प्रकल्प मोठा करा, पण झाडे कापू नका
नाशिक : “माईस प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र त्या नावाखाली झाडांची कत्तल होता कामा नये. माईस मोठं करा, पण झाडं कापू नका,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपोवन परिसराला रिझर्व्ह फॉरेस्ट जाहीर करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, राजेंद्र बागुल, निरंजन टकले यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की ,
तपोवनातील जंगलतोडीविरोधात गेल्या दीड महिन्यापासून स्थानिक नागरिक लढा देत असून या आंदोलनाला आपण पाठिंबा दिल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. नाशिकसाठी पर्यावरणप्रेमी आंदोलन करत असल्याचे सांगत, तपोवन हे हिरवेगार जंगल असून ते जतन करणे गरजेचे आहे.आरवली पर्वतमालेत मायनिंगसाठी कत्तल होत असताना शेतकरी आणि गावकरी रस्त्यावर उतरल्याचा दाखला देत, पुण्यातील वेताळ टेकडीचा मुद्दा आठवण करून दिली. “मी मंत्री असताना वेताळ टेकडीवरील काम थांबवले होते,” असे ठाकरे म्हणाले.“माईस च्या नावाखाली डान्स पार्ट्या चालवणार का? यलो झोन करून टी डी आर घेण्याचा डाव होता का? तो बिल्डर कोण आहे?” असे सवाल उपस्थित करत, तपोवन तोडण्यामागे असणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
“आपल्या धर्मात पंचमहाभूतांची पूजा केली जाते, पण तेच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचा धर्म हा बिल्डर धर्म आहे,” अशी टीका त्यांनी केली. ठाकरे यांनी वडाचे झाड वाचविल्याचा उल्लेख करत, अंजनेरी येथे रोपवे प्रकल्पाचाही संदर्भ दिला. झाडे कापली जाणार नाहीत, यासाठी प्रतिज्ञापत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जागावाटप बाबत“कालपर्यंत सगळं ठरलेलं होतं, मग आता काय राहिलं?” असा सवाल करत त्यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावर सूचक टिप्पणी केली.
योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील प्रचारावर टीका
“मुंबईची तुलना उत्तर प्रदेशशी करू नका. कोविड काळात उत्तर प्रदेशात काय परिस्थिती होती, ते सर्वांनी बघितली आहे. उत्तर प्रदेशात कोणते विकासकामे केली याचे योगी यांनी उत्तर द्यावे असे आवाहन देखील ठाकरे यांनी केले. “भाजप कार्यकर्त्यांचं वाईट वाटतं. आजही त्यांना चादरी उचलाव्या लागत असल्याचे ठाकरे यांनी केले त्यांचं भवितव्य काय?” असा सवाल करत, “ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांनाच भाजपमध्ये घेतले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, “त्यांना दिल्लीला रोज ट्रेन मिळणार आहे का? ईडी आणि सीबीआयसाठी रोज जावं लागेल. तरीही भाजप कार्यकर्त्यांचं वाईट वाटतं,” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
