राहुल गांधींच्या वकिलांची मागणी
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दावा दाखल करणाऱ्या सात्यकी सावरकर यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी, अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधींच्या वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयात दाखल केला. सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्याचा उल्लेख असलेल्या राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणाची सीडी व प्रमाणित शब्दांकन वारंवार मागणी करूनही तक्रारदारांनी बचाव पक्षाला दिलेले नाही. ही कृती न्यायालयीन प्रक्रिया अडवणारी व स्पष्ट आदेशाचे उल्लंघन करणारी आहे. म्हणून खटला सुरू होण्यापूर्वीच या दुर्दम्य व दुर्लक्ष करणाऱ्या वर्तनाची गंभीर दखल घेऊन न्यायालयीन अवमानाची कारवाई व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी केली. या प्रकरणी आता १३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
सात्यकी सावरकरांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करा !
0
Share.