bank of maharashtra

भारतात होणार सुखोई सुपरजेट एसजे-१०० सिव्हिल कम्यूटर विमानाची निर्मिती

0

नवी दिल्ली : भारताने रशियासोबत विमानवाहतूक क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि रशियाची पब्लिक जॉइंट स्टॉक कंपनी यूनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) मॉस्को येथे एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार भारतामध्ये सुखोई सुपरजेट एसजे-१०० या सिव्हिल कम्यूटर विमानाचे उत्पादन केले जाणार आहे. हा ट्विन-इंजिन, नैरो-बॉडी विमान प्रकार आहे, जो सुमारे १०० प्रवाशांना नेण्यास सक्षम असून त्याची उड्डाण श्रेणी सुमारे ३००० किलोमीटर आहे. हे विमान मुख्यतः देशांतर्गत उड्डाणांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत २०० पेक्षा अधिक असे विमान तयार करण्यात आले आहेत आणि १६ हून अधिक विमान कंपन्या त्याचा वापर करत आहेत.

तज्ञांच्या मते, भारतात एसजे-१०० चे उत्पादन देशाच्या क्षेत्रीय हवाई संपर्क योजना “उडान” साठी गेम-चेंजर ठरू शकते.यामुळे देशातील लहान शहरं आणि गावं हवाई नेटवर्कशी अधिक प्रभावीरीत्या जोडली जातील. या करारानंतर एचएएल ला भारतात एसजे-100 विमानाच्या उत्पादनाचे विशेष हक्क प्राप्त झाले आहेत.ही योजना केवळ भारतीय नागरी विमानवाहतूक क्षेत्राला नवी उंची देणार नाही, तर ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही मोठी चालना देईल.याशिवाय, या प्रकल्पामुळे भारताच्या विमान उत्पादन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.

एचएएल साठी ही एक मोठी तांत्रिक उपलब्धी असेल, आणि ती भारताच्या आत्मनिर्भरतेला नवी दिशा देईल.विमान निर्मितीशी संबंधित स्पेअर पार्ट्स, मेंटेनन्स आणि सप्लाय चेन या क्षेत्रांमध्येही हजारो रोजगार संधी निर्माण होतील. रक्षण क्षेत्रात रशियासोबत आधीपासून असलेली भक्कम भागीदारी आता नागरी विमानवाहतूक क्षेत्रातही अधिक खोल होणार आहे. एसजे-१०० विमान भारतातील प्रादेशिक प्रवास क्षेत्राचे रूपांतर करू शकते, विशेषतः त्या भागांमध्ये जिथे सध्या हवाई सेवा मर्यादित आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech