bank of maharashtra

गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा

0

मुंबई : दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक कैलाश खेर यांनी आता गाण्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देत सामान्यजनांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे मानव, हे मानव
आदते अब बदल दो
कुदरत के बवंडर का
इशारा अब समझ लो

असं म्हणत त्यांनी प्रत्येकाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील प्रमोशनल गाणं गायक कैलास खेर यांनी गायलं आहे. अरविंद भोसले यांनी लिहिलेल्या या गाण्याला श्रेयस देशपांडे यांनी संगीत दिलं आहे.

‘अवकारीका’ चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छतेचा हा नारा आता रुपेरी पडद्यावरही घुमणार आहे. स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. अनेकांना मात्र त्याची जाणीवही नसते. या गाण्याच्या माध्यमातून त्यांना ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे माझ्यासाठीसुद्धा हा अतिशय वेगळा अनुभव आहे, असं गायक कैलास खेर यांनी सांगितलं.

स्वच्छतेसारखा एक महत्त्वाचा सामजिक प्रश्न ‘अवकारीका’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येईल व लोकांपर्यंत पोहचवता येईल या विश्वासाने चित्रपट दिग्दर्शनाचे शिवधनुष्य हाती घेतल्याचे हाती घेतल्याचे दिग्दर्शक अरविंद भोसले सांगतात. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech