bank of maharashtra

पूरग्रस्तांसाठीच्या नुकसान भरपाईचे धोरण लवकर जाहीर करावे – शरद पवार

0

पुणे : राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पूराने अतोनात नुकसान झाले आहे, या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरीत करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, या नुकसानीमुळे शेतकरी संकटात आहे, राज्य सरकारच्या वतीने या बाबत नेमके काय धोरण जाहीर केले जाते, हे पाहावे लागेल. असे संकट या पूर्वी आलेले नव्हते, त्या मुळे सरकार यात नेमकी काय मदत करणार काय नुकसान भरपाई देणार हे महत्वाच असेल.

विदर्भ मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात पिके वाहून गेली असून शेतक-यांचे कंबरडे मोडलेले आहे, अशा स्थितीत त्यांना आर्थिक व इतर बाबतीतही दिलासा देणे गरजेचे आहे. मराठवाडा दुष्काळात असतो यंदा अतिवृष्टीच संकट आहे. सोलापूर व सातारा भागातही काही ठिकाणी नुकसान झालेले आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन त्यांनाही केंद्राच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी व भरघोस मदतीची मागणी केली आहे. त्यांच्याकडून लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech