नाशिक : नाशिकमध्ये लव्ह जिहादचे प्रकरणी पुढे आले असून पिडीतेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपीचे खरे नाव सोहेल आवेश अन्सारी असून त्याने विशाल जाधव असे खोटे नाव सांगून पिडीतेवर अत्याचार केल्याची माहिती पुढे आलीय.यासंदर्भात पोलिसांना मिळालेल्या फिर्यादित नमूद केल्यानुसार नाशिकच्या इंदिरानगर भागात राहणाऱ्या हिंदू तरुणीची आरोपी सोहेल आवेश अन्सारी या तरुणाने फसवणूक केली.
आरोपी हा नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील भारतनगर येथील रहिवासी आहे. त्याने पिडीतेला विशाल जाधव असे नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पिडीतेला सातपूर सरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंधप्रस्थापित केले. तसेच पिडितेला इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. त्यानंतर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीतेला परपुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवायला लावले. मात्र, पिडीतेने अशा कृत्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या आरोपीने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार मे २०२५ ते सप्टेंबर महिन्यादरम्यान वडाळा गावात घडला. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून नाशिकच्या इंदिरानगर पोलिसात आरोपी सोहेल अन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त देशमुख यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.