bank of maharashtra

‘ स्त्री और समय’ पुस्तक, ‘दुनिया मेरी उडान देखेगी’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन

0

नाशिक : समाजात दुर्दैवाने अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या हुंडा बळी या सामाजिक समस्येमुळे अनेक निरपराध, संवेदनशील विवाहिता बळी पडत आहेत, यावर भाष्य टाकणाऱ्या मीनाक्षी निर्मला लिखित “स्त्री और समय” या आशयघन नाटकावरील पुस्तकाचा आणि “दुनिया मेरी उडान देखेगी” या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचा प्रकाशन सोहळा महाकवी कालिदास कला मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला.

मेसर्स पद्मश्री बिल्डर्स पराग अहिरे हे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लेखिका मीनाक्षी निर्मला यांच्या “स्त्री और समय” या नाटकावरील पुस्तकाला विजया जीवन यांची प्रस्तावना आहे. एका सधन कुटुंबातील अतिशय संवेदनशील ममता या विवाहितेचा तिच्या सासरच्यांकडून तिने आपल्या माहेराहून जमीन व भरपूर पैसे वगैरे आणावे यासाठी छळ केला जात असतो. तिचा पती केशव या प्रकरणात हतबल असतो. तिचा भाऊ रघु आपल्या या दुर्दैवी बहिणीला साथ देतो. समाजातील हुंडा बळी समस्या एक सामाजिक गुन्हा असून त्याला चहूबाजूने प्रतिकार करणे आवश्यक आहे हेच “स्त्री और समय” या कलाकृतीतून अतिशय प्रभावीपणे सांगण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक पुणे येथील संवेदना प्रकाशनने केले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech