मुंबई : आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही. पण, तुम्ही अरेरावी केली तर दणका बसणारच. कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसेल अशी कोटी करत राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर आपली मते मांडली. मुंबईच्या मिरा भाईंदर येथे आज, शुक्रवारी आयोजित जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधासाठी झालेल्या मोर्चामुळे मिरा भाईंदरमध्ये गदारोळ झाला होता. मराठी भाषंकानी काढलेल्या मोर्चापुढे सरकाला नमते घ्यावे लागले हाते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मिरा भाईंदरच्या जनसभेत सांगितले की, दुकानदारांना मारहाण झाली म्हणून मोर्चा काढला. विषय समजून न घेता कोणत्यातरी पक्षाच्या दबावाखाली बंद पुकारलात पण मला एक प्रश्न विचारायचा आहेत की किती दिवस दुकाने बंद ठेवणार आहात. मराठी माणसांनी सामान घेतले तरच तुमची दुकाने चालतील, नाहीतर तुमची पोट कशी भरतील ? असा सवाल केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदीच्या सक्ती संदर्भात केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले की, जर हिंदी सक्तीची करून सरकारला आत्महत्या करायची तर बेशक करावी. मस्ती करणार असाल तर महराष्ट्राचा दणका बसणार असा इशाराही दिला. हिंदुत्वाच्या बुरखा खालून तुम्ही मराठी संपवणार असाल तर माझ्यासारखा मराठी तुम्हाला सापडणार नाही. मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत सर्व मतदार संघ त्यांना अमराठी करायचे आहेत. ही नुसती माणसे येत नाही, हे मतदार संघ बनावट आहेत. उद्या सांगणार आमचा खासदार आमदार महापौर, असे करत हा सगळा पट्टा गुजरातला लावायचा प्रयत्न सुरू आहे. हे षडयंत्र समजून घ्या, सहज आलेला माज नाही हा, हा माज तिथून आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
तुमची भाषा आणि तुमची जमीन गेली तर तुम्हाला अर्थ नाही, कोणी विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणे गरजेचे आहे बिहारमध्ये आजही ९९ टक्के मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाहीत. हनुमान चालीसा अवधीमध्ये आहे, हिंदीत नाही. मराठी भाषेचा इतिहास आपण समजून घ्यायला हवा. माझे तर सगळ्या भाषेवर प्रेम आहे, महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत, त्यापेक्षा माझे हिंदी चांगली आहे,. याचे कारण माझे वडील आहेत. माझ्या वडिलांना उत्तम मराठी हिंदी, उर्दू येत होते. भाषा कधीच वाईट नसते पण आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार. लहान मुलांवर तर लादू देणारच नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.यावेळी
भाजप खासदार निशिकांत दुबेच्या मराठी माणसांसंदर्भातील बेताल विधानाचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु. त्याच्यावर केस झाली का ? असा सवाल केला. तसेच दुबे आम्हाला पटक पटके मारणार ? दुबेला मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जावो. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…”असे म्हणत ठाकरे यांनी निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिले.