bank of maharashtra

रशियाकडून तेल खरेदीवरून राहुल गांधींकडून अनेक प्रश्न उपस्थित

0

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार या विधानावर टीका केली आहे आणि ते भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह असल्याचे म्हटले आहे. एक्स-पोस्टमध्ये राहुल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे म्हणण्याची संधी ट्रम्प यांना कशी मिळाली. पंतप्रधानांना कशाची भीती आहे? अर्थमंत्र्यांचा अमेरिका दौरा का पुढे ढकलण्यात आला? भारताने शर्म अल-शेख परिषदेत भाग घेण्याचे का टाळले? पंतप्रधान ट्रम्प यांच्या “ऑपरेशन सिंदूर” वरील विधानाचा निषेध का करत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले होते की, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल. ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले की, ते रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर नाराज आहेत आणि पंतप्रधान मोदींनी त्यांना आश्वासन दिले आहे की, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. मोदी त्यांचे मित्र आहेत आणि या निर्णयाचा जागतिक ऊर्जा संतुलनावर सकारात्मक परिणाम होईल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech