bank of maharashtra

प्राडा विरुद्ध कोल्हापुरी वाद – अभिनेत्री नीना गुप्ताने शेअर केली कोल्हापुरी चप्पल विषयी पोस्ट

0

मुंबई : प्राडा विरुद्ध कोल्हापुरी वादाच्या पार्श्वभूमीवर आता ‘पंचायत’ची अभिनेत्री फॅशनिस्टा नीना गुप्ता यांनी कोल्हापुरी चप्पल विषयी एक फोटो पोस्ट शेअर केलीय.त्यांनी कोल्हापूरी चपलेच्या बाजूने भूमिका घेतली आहे. खास म्हणजे अभिनेत्री नीना यांना दिवंगत मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ही कोल्हापुरी चप्पल भेट दिली होती, जी हँडमेड आहे. नीना गुप्ता यांनी प्राडा विरुद्ध कोल्हापुरी वादाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट केलीय.त्यांनी इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे क्लासिक कोल्हापुरी चप्पलेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

याआधी करीना कपूर खानने देखील लक्झरी ब्रँड प्राडावर टीका करत भारतीय फुटवेअरचे समर्थन केले होते.नीना गुप्ता यांनी व्हिडिओमध्ये त्यांची कोल्हापुरी चप्पल दाखवली आहे. रिपोर्टनुसार नीना यांनी म्हटलं की, ”हस्तनिर्मित कोल्हापुरी चप्पल, दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट दिली. एक कलाकृती, एक आठवणी..खरोखरच अद्वितीय.” तिच्या या व्हिडिओवर नेटिझन्स म्हणाले- ”कोल्हापुरीने स्वतःची जागा निर्माण केलीय. भारतीय ब्रँडला पाठिंबा आणि प्रमोट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही नेहमीच प्रेरणा आहात.” दुसऱ्याने पुढे म्हटले, ”वा इतके वर्ष जशीच्या तशी आहे, हे अद्भुत आहे.”

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech