मुंबई : स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. मालिकेतल्या प्रत्येक सीनवर कौतुकाचा वर्षाव होतोय.या मालिकेत नुकताच जीवा-नंदिनीची मनधरणी करत असतानाचा सीन चित्रीत करण्यात आला. समुद्र किनारी एकटक पहात असलेल्या नंदिनीसमोर जीवा कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो अश्या आशयाचा हा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
अश्विनी शेंडे आणि गौरव शिरीष या लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या या कवितेचे शब्द थेट मनाला भिडतात. नंदिनी आणि जीवाची भूमिका साकारणाऱ्या विवेक सांगळे आणि मृणाल दुसानिस यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने हा सीन आणखी खुलवलाय. ज्या कवितेची सोशल मीडियावर इतकी चर्चा रंगतेय हि कविता अशी आहे कि, तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं…तू सुगंध गज-याचा, माझं फिकं फिकं अत्तर..तुला पडणा-या प्रश्नाचं, मी शोधू पाहातोय उत्तर…सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ…माझ्याही जुन्या फिलिंग्जवर जमली होती धूळ….आम्ही मुलं अशीच असतो, आम्हाला काहीच कळत नाही…सगळं कळूनसुद्धा, वेळेत वळत नाही. पण तू पिळलास कान, आता आलीये मला जाग…आता तरी सोडून दे, नंदिनी तुझा राग…तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं..
दरम्यान, जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या नात्याचं कोडं नेमकं कसं सुटणार हे पहायचं असेल तर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे भाग दररोज सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर बघायला मिळतील. या मालिकेत मृणाल दुसानिस, विवेक सांगळे, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत असल्याचं दिसतंय.