bank of maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनामध्ये; ५७ वर्षांत प्रथमच राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा

0

ब्यूनस आयर्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्रिनिदाद आणि टोबॅगोनंतर पंतप्रधान मोदी अर्जेंटिना येथे पोहोचले आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून ही भेट खूप महत्त्वाची मानली जाते, कारण ५७ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान द्विपक्षीय भेटीसाठी अर्जेंटिनाला गेले आहेत.२०१८ मध्ये पंतप्रधान मोदी जी२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अर्जेंटिनाला गेले होते. पण त्यावेळी ते एका बहुपक्षीय परिषदेचा भाग होते. यावेळी ही भेट पूर्णपणे द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी आहे.

पंतप्रधान मोदी अर्जेंटिनामधील एझेइझा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान मोदी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांनाही भेटणार आहेत.दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये संरक्षण, शेती, ऊर्जा, खाणकाम, अक्षय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि गुंतवणूक अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. अर्जेंटिनाच्या भेटीनंतरपंतप्रधान मोदी १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीललाही भेट देतील. आणि बहुपक्षीय जागतिक आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. यानंतर पंतप्रधान मोदी नामिबियालाही भेट देणार आहेत. यामध्ये भारत-आफ्रिका संबंधांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech