नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ महापर्वाच्या पवित्र प्रसंगी जगभरातील आणि देशभरातील भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत, ज्या महापर्वाची आज पारंपरिक ‘नहाय-खाय’(स्नानादि कर्मे) या पारंपरिक विधीने सुरुवात झाली. सर्व व्रतींच्या अढळ भक्तिभावाला पंतप्रधानांनी अभिवादन केले आहे आणि या चार दिवसांच्या उत्सवाचे सखोल सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले आहे. मोदी यांनी छठच्या वाढत्या जागतिक मान्यतेची प्रशंसा केली आणि या धार्मिक विधीमध्ये जगभरातील भारतीय कुटुंबे मनोभावे या विधीमध्ये सहभागी होत असतात असे सांगितले. या पर्वाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी छठी मातेची वंदना करणारे एक भक्तीगीत सामायिक केले आणि या आध्यात्मिक नादघोषात संपूर्णपणे विलिन होऊन जाण्यासाठी प्रत्येकाला आमंत्रित केले.
एक्सवर पोस्ट केलेल्या एका थ्रेडमध्ये मोदी यांनी लिहिलेः
“’नहाय-खाय’च्या पवित्र अनुष्ठानासह आजपासून चार दिवसीय महापर्व छठचा शुभारंभ होत आहे. बिहारसह देशभरातील भाविकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सर्व व्रतस्थांना माझे नमन आणि वंदन!” “आपल्या संस्कृतीचा हा विराट उत्सव साधेपणा आणि संयमाचे प्रतीक आहे, ज्याचे पावित्र्य आणि नियम-निष्ठा अतुलनीय आहे. या पवित्र प्रसंगी छठच्या घाटांवर जे दृश्य दिसते, त्यामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक सद्भावनेची अद्भुत प्रेरणा असते. छठच्या प्राचीन परंपरेचा आपल्या समाजावर अतिशय खोलवर प्रभाव आहे.”
“आज जगाच्या कानाकोपऱ्यात छठ संस्कृतीचा महाउत्सव म्हणून साजरा केला जातो. जगभरात राहणारी भारतीय वंशाची कुटुंबे या परंपरांमध्ये संपूर्ण आत्मियतेने सहभागी होतात. छठी माता तुम्हाला भरपूर आशीर्वाद देऊ देत अशी माझी मी कामना करतो” “छठ महापर्व आस्था, उपासना आणि निसर्गप्रेमाचा एक अनोखा संगम आहे. यामध्ये जिथे अस्त होणाऱ्या आणि उदय होणाऱ्या सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते, त्याच प्रकारे प्रसादात देखील निसर्गाचे विविध रंग सामावले जातात. छठ पूजेची गीते आणि सुरांमध्येही भक्ती आणि निसर्गाचा अद्भुत भाव भरलेला असतो.”
“हे माझे भाग्य आहे की कालच मला बेगूसरायला जाण्याची संधी मिळाली होती. बिहार कोकिळा शारदा सिन्हा यांचे बेगूसराय सोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. शारदा सिन्हा जी आणि बिहारच्या अनेक लोककलावंतांनी आपल्या गीतांनी छठच्या उत्सवाला एका वेगळ्या भावाने जोडले आहे.” “आज या महापर्वाच्या निमित्ताने मी आज तुम्हा सर्वांसोबत छठी मातेची अशी गीते सामायिक करत आहे जी ऐकल्यावर प्रत्येक जण मंत्रमुग्ध होईल.
