bank of maharashtra

पंतप्रधान जी–20 शिखर परिषदेकरिता दक्षिण आफ्रिकेला रवाना

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी–20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. समावेशक विकास, आपत्ती जोखीम कमीकरण आणि सर्वांसाठी न्याय्य भविष्य अशा विषयांवर ते तीन महत्त्वपूर्ण सत्रांना संबोधित करणार आहेत. याशिवाय, ते इंडिया–ब्राझील–दक्षिण आफ्रिका (आयबीएसए) नेत्यांच्या बैठकीतही सहभागी होतील आणि जी–20 शिखर परिषदेत भारताचा दृष्टिकोन मांडतील.

पंतप्रधान मोदी यांनी आज, शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरासाठी प्रस्थान असून 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान आयोजित 20व्या जी–20 शिखर परिषदेत ते सहभाग घेणार आहेत. विशेष म्हणजे, विकासशील देशांमध्ये आयोजित होणारी ही सलग चौथी जी–20 शिखर परिषद आहे. पंतप्रधान मोदींसह जगातील अनेक राष्ट्रप्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत मोदी भारताचा व्यापक दृष्टिकोन प्रस्थापित करतील.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान तीन मुख्य सत्रांना संबोधित करू शकतात. पहिल्या सत्राचा विषय आहे समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकास – ज्यात कोणीही वंचित राहू नये. दुसरे सत्र “गतिमान विश्व – जी20 चे योगदान यावर आधारित असून त्यामध्ये आपत्ती जोखीम कमीकरण, हवामान बदल यांसारख्या जागतिक आव्हानांवर चर्चा होणार आहे. तिसऱ्या सत्राचा विषय आहे “सर्वांसाठी न्याय्य आणि समतोल भविष्य.” या तिन्ही सत्रांत मोदी मार्गदर्शन करतील अशी शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, “मी सिरिल रामफोसा यांच्या निमंत्रणावर दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या वीसाव्या जी–20 लीडर्स समिटमध्ये सहभागी होत आहे. मोदी म्हणाले की, ही परिषद विशेष ठरणार आहे कारण आफ्रिका खंडात होणारी ही पहिली जी–20 शिखर परिषद आहे. 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेदरम्यान अफ्रिकन युनियनला जी–20 चे सदस्यत्व देण्यात आले होते.ताज्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली आयोजित इंडिया–ब्राझील–दक्षिण आफ्रिका (आयबीएसए) नेत्यांच्या बैठकीतही सहभागी होतील.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech