bank of maharashtra

पाकिस्तानमधील प्रवासी कराचीऐवजी सौदीला पोहचला

0

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाहोरचा शाहजैन हा तरुण कराचीला विमानाने गेला होता.पण तो चुकून सौदी अरेबियातील जेद्दाहला पोहोचला. शाहजैनने एका खाजगी विमान कंपनीवर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्याने म्हटले आहे की. तिकीट तपासल्यानंतरही एअर होस्टेसने त्याला चुकीच्या विमानात चढण्यापासून रोखले नाही. डोमेस्टिक टर्मिनलच्या गेटवर दोन फ्लाईट्स उभ्या होत्या. काहीही न कळता तो जेद्दाहला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये चढला. सुमारे दोन तासांनंतरही जेव्हा विमान कराचीला पोहोचले नाही तेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली. तो म्हणाला की, त्यावेळी क्रू घाबरले आणि त्याला दोष देऊ लागले.शाहजैन म्हणतो की, त्याच्याकडे सौदी अरेबियाचा पासपोर्ट किंवा व्हिसा नव्हता. तरीही तो जेद्दाहला पोहोचला.

एअरलाइनच्या या निष्काळजीपणामुळे त्याला परदेशात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तिथे एफआयए अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली आणि त्याला कराचीला आणण्याच्या प्रक्रियेला दोन ते तीन दिवस लागले. शाहजहानने आता एअरलाइनला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याने म्हटले आहे की, एअरलाइनच्या चुकीमुळे त्याचे मोठे मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. तो भरपाईची मागणी करत आहे, ज्यामध्ये अतिरिक्त प्रवास खर्च आणि गैरसोयीचा समावेश आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech