bank of maharashtra

मागणी घटल्याने कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी चिंतेच्या छायेत

0

लासलगाव : मागील काही दिवसापासून सातत्याने कांद्याच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे आणि आवश्यक त्या पद्धतीप्रमाणे खरेदी होत असल्यामुळे भावामध्ये मोठ्या प्रमाणावर ती घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कांद्याचे पीक घेऊन कर्जबाजारी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सध्या लासलगाव व पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर ७०० ते ८५० रुपये क्विंटल इतके असून, उत्पादन खर्च १२०० ते १४०० रुपये क्विंटल आहे. या तफावतीमुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला.

लासलगाव बाजार समितीत दररोज सरासरी १८ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक असूनही व्यापाऱ्यांची मागणी मंदावली आहे. ‘नाफेड’ची खरेदी निवडक बाजारा समितीमध्ये झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. परिणामी, मोठ्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. सातत्याने कांद्याच्या दरामध्ये घट होण्यामागे या परिसरातील जाणकारांच्या मते बाजारातील कांद्याची मागणी ही कमी झालेली आहे. कांद्याची साठवणूक करण्याची मर्यादा यावर मोठा परिणाम करीत आहे. निर्यात क्षेत्रामध्ये केंद्र सरकारचे जे धोरण आहे. ते पूर्णपणे धरसोड वृत्तीचे आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हात दरावरती होत आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech