bank of maharashtra

ऑपरेशन सिंदूरचा पुढील टप्पा आधीपेक्षा अधिक घातक असेल – ले. जनरल मनोज कटियार

0

नवी दिल्ली : पाकिस्तानवर यापुढे जी कारवाई केली जाईल, ती ऑपरेशन सिंदूर पेक्षाही अधिक घातक असेल,” असा कठोर इशारा लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांनी पाकिस्तानला दिला आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या स्मरणार्थ आयोजित मेगा माजी सैनिक रॅलीमध्ये ते बोलत होते. लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना थेट इशारा देताना म्हटले, “जोपर्यंत पाकिस्तानच्या विचारसरणीत बदल होत नाही, तोपर्यंत तो अशा कारवाया सुरूच राहील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण त्याचे हवाई तळ आणि चौक्या उद्ध्वस्त केल्या, पण तो पुन्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकतो. यावेळी आपली कारवाई मागच्यावेळेपेक्षा जास्त प्रखर आणि घातक असेल. ऑपरेशन सिंदूर २.० अधिक विध्वंसक ठरेल. आमची पूर्ण तयारी सुरू आहे. मागच्या वेळेला सीजफायर झाला होता, पण यावेळी आपण त्याही पुढे जाऊ.”

कमांडर म्हणाले की पाकिस्तानकडे भारताशी थेट लढण्याची क्षमता नाही, पण तो पुन्हा पहलगामसारखे हल्ले करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यांनी स्पष्ट केलं की अशा हालचालींच्या उत्तरात ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा अधिक घातक असेल. ते म्हणाले, “पाकिस्तान अजूनही ‘भारताला हजार जखमांद्वारे रक्तबंबाळ करण्याच्या’ धोरणावर ठाम आहे, आणि भारतीय सेना अशा धोरणाला निष्फळ ठरवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.” याआधी, माजी सैनिकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की पाकिस्तान पुन्हा पहलगामसारखा हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो. ते म्हणाले, “त्यांच्यात आमच्याशी थेट लढण्याची हिंमत नाही. पाकिस्तान आपले कटकारस्थाने सोडणार नाही, पण भारतीय सेना त्यांना अपयशी ठरवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. यासाठी आपल्याला जनतेचा, विशेषतः माजी सैनिकांचा पाठिंबा आवश्यक आहे. आम्हाला आशा आहे की माजी सैनिक आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहतील.”

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech