bank of maharashtra

सीपीए वेस्ट झोन परिषद: लोकसभा अध्यक्षांचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले स्वागत

0

पणजी : कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (सीपीए) इंडिया रिजन, झोन-VII (वेस्ट झोन) परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गोव्यामध्ये उपस्थित आहेत. या दोन दिवसीय परिषदेच्या निमित्ताने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज पणजीत दाखल झाले. यावेळी डॉ गोऱ्हे यांनी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे स्वागत केले.

डॉ. गोऱ्हे यांनी ओम बिर्ला यांचे स्वागत करताना संसदीय सहकार्य व सर्वोत्तम पद्धतींच्या आदान-प्रदानावर भर दिला. या परिषदेत महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या विधानमंडळातील स्पीकर, उपसभापती, चेअरमनसह इतर प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ही झोन-VII ची पहिली परिषद आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech