bank of maharashtra

नागपूरमध्ये पाकिस्तानशी लागेबांधे असलेल्या दोघांना अटक

0

एटीएसच्या नागपूर युनिटने कामठीतून घेतले ताब्यात

नागपूर : पाकिस्तानशी लागेबांधे असल्यावरून नागपूर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जिल्ह्यातील कामठी येथून आज, शनिवारी पहाटे २ संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही सोशल मिडीच्याच्या माध्यमातून पाकिस्तानशी जोडल्याची टीप एटीएसला मिळाली होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात आलीय. एटीएसच्या ताब्यातील दोन्ही संशयित कामठीच्या इमलीबाग परिसरात वास्तव्याला असून मागील बऱ्याच काळापासून ते सोशल माध्यमांवर सक्रिय होते. सोशल माध्यमांतून ते दोन्ही संशयित पाकिस्तानातील काही लोकांच्या संपर्कात होते. त्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना चौकशीसाठी एटीएसच्या नागपूर कार्यालयात नेण्यात आले. यापैकी एक जण कामठी येथील सर्वाज जुन्या उर्दू विद्यालयात नोकरीला असल्याची माहिती पुढे आली आहे.

यापूर्वी ऑपरेशन सिंदूरच्या वेळी नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला कारगिलमधून एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेली होती. ती महिला देखील सोशल माध्यमातूनच पाकिस्तानमधील व्यक्तींच्या संपर्कात आली होती. पाकिस्तानी रेंजर्सने तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची सखोल चौकशी झाली होती. आता कामठीतील दोन्ही व्यक्ती नेमके कुठल्या कारणासाठी पाकिस्तानमध्ये संपर्कात होते याची एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech