bank of maharashtra

मारहाणीचा पश्चात्ताप नाही – आ. संजय गायकवाड

0

मुंबई : एकीकडे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना आकाशवाणी आमदार निवासातील कँटिनमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री समोर आला. या घटनेनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिलेलं जेवळ निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवण होतं, त्यानंतरच माझी तेथील कर्मचाऱ्यांवर झालेली ती माझी प्रतिक्रिया होती, असं आमदार गायकवाड म्हणाले.

गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘कँटिन मालकाची मुजोरी इतकी वाढली आहे की, अनेकांच्या ताटात पाल, उंदीर, झुरळं निघतात. कालच्या घटनेनंतर अनेकांचे फोन आले आणि त्यांनी आमच्यासोबतही असं घडल्याचं सांगितले. या निकृष्ट जेवणाबद्दल माझी त्या कँटिनमध्ये अशाप्रकारे रिअॅक्शन होती. मी केलेल्या गोष्टीचा मला पश्चाताप नाही, विधानभवनात अध्यक्षांनी परवानगी दिली तर हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आमदार असलो तरी मी माणूस आहे, कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल, तर मला माझ्या जीवनरक्षणाचा अधिकार आहे.

३० ते ३५ वर्षांपासून आकाशवाणीच्या कँटिनमध्ये मी जेवतो आहे. मंगळवारी रात्री १० वाजता मी कँटिनमध्ये दोन चपाती, डाळ, राइस अशी ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर एक घास खाल्ला आणि काहीतरी गडबड असल्याचं वाटलं. दुसरा घास खाल्ल्यानंतर उलटी झाली. उलटी झाल्यानंतर मी आहे तसाच कँटिनमध्ये आलो आणि कँटिनमधील कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली, हे जेवण कोणी दिलं, त्या लोकांना बोलवा असं सांगितलं. तिथे मॅनेजरलाही डाळ दाखवली. कँटिनमध्ये जेवणाऱ्या इतरांनाही डाळ दाखवली. सगळ्यांनी हे जेवळ निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर माझी तेथील कर्मचाऱ्यावर झालेली ती प्रतिक्रिया होती.

याआधी त्या कँटिनमध्ये अंडी, नॉनव्हेज १५-१५ दिवसांची दिली जात होती. चार-पाच दिवसाच्या भाज्या दिल्या जात होत्या. याबाबत मी संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली, कँटिन मालकाला समजावून सांगितलं, अशाप्रकारे महाराष्ट्रातील लोकांच्या, आमदारांच्या जीवाशी खेळू नका. विधानसभेच्या काळात दिवसाला जवळपास १० हजारच्या संख्येने लोक गावखेड्यातून येत इथे जेवतात. राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते, अधिकारी, शेतकरी, पक्षाचे कार्यकर्ते अनेक लोक इथे शासकीय कँटिनमध्ये येतात, जेवण स्वस्तात मिळेल अशा भावनेने येतात, पण कँटिनचा मालक त्याला ३० वर्षांपासून सतत कॉन्ट्रॅक्ट मॅनेज करुन दिलं जातं, कोणत्या अधिकाऱ्याचं साटलोटं आहे हे सांगता येणार नाही,’ असं संजय गायकवाड म्हणाले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech