bank of maharashtra

मध्यप्रदेशच्या गणेश विसर्जनादरम्यान हिंसाचार

0

बुरहानपूर : मध्यप्रदेशच्या बुरहानपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हनुमान चालीसा पठणावरून दोन समुदायांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर जमावाने एकमेकांवर दगडफेक केली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने रविवारी अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुका निघाल्या. बुरहानपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात भाविकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. दरम्यान काही लोकांनी हनुमान चालीसा पठण सुरू केले. हे पाहून दुसऱ्या धर्मातील काही लोक संतप्त झाले आणि त्यांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. हनुमान चालीसा पठणादरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे वातावरण अधिकच तणावग्रस्त झाले. दोन्ही समुदायांमध्ये झटापट सुरू झाली आणि यात काही जण जखमीही झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. एसपी बागरी यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून जमाव पांगवण्याचे आदेश दिले. काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.सध्या संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जात आहे आणि आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech