bank of maharashtra

करूर चेंगराचेंगरी : सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआय चौकशीचे आदेश

0

टीव्हीकेची याचिका स्वीकारली

नवी दिल्ली : टीव्हीकेने तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता-राजकारणी विजय यांच्या रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची स्वतंत्र चौकशी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर निकाल देत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. टीव्हीकेने सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चेंगराचेंगरीची चौकशी करण्याची मागणी केली होती. कारण पक्षाने म्हटले होते की, केवळ तामिळनाडू पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने जनतेचा विश्वास निर्माण करणार नाही. पक्षाने असाही आरोप केला की,चेंगराचेंगरी ही पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकते.

टीव्हीकेच्या विनंतीवरून, सर्वोच्च न्यायालयाने करूर चेंगराचेंगरीच्या सीबीआय चौकशीचे निरीक्षण करण्यासाठी समितीचे प्रमुख म्हणून माजी न्यायाधीश अजय रस्तोगी यांची नियुक्ती केली आहे. टीव्हीकेचे सचिव आधव अर्जुन यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. यापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने एक एसआयटी स्थापन केली होती. आणि याला टीव्हीकेने आव्हान दिले होते. चेंगराचेंगरीनंतर लगेचच वाद आणि आरोपांना सुरुवात झाली. करूर पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती. ज्यामध्ये टीव्हीकेचे करूर (उत्तर) जिल्हा सचिव मधियाझगन, सरचिटणीस बसी आनंद आणि सहसरचिटणीस सीटीआर निर्मल कुमार यांच्यावर खून, हत्येचा प्रयत्न आणि इतरांचे जीव धोक्यात घालणे यासारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीत गुप्तचर यंत्रणेने कोणताही दोष नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विजय रॅलीत उशिरा पोहोचला आणि लोक अनेक तासांपासून वाट पाहत होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी आयोजकांना विजयची विशेष रॅली बस नियुक्त केलेल्या जागेच्या किमान ५० मीटर आधी थांबवण्याचे निर्देश दिले होते. पण आयोजकांनी बस नियुक्त केलेल्या जागेवर उभी केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “नेता १० मिनिटे बसमधून बाहेर पडला नाही. ज्यामुळे गर्दीत असंतोष निर्माण झाला. जनता त्याला पाहण्यास उत्सुक होते.” टीव्हीकेने १०,००० लोकांना सामावून घेण्यासाठी रॅलीसाठी परवानगी मागितली होती. पण सुमारे २५,००० लोक जमले होते. पोलिसांनी सांगितले की, पक्षाने पाणी, सुरक्षा आणि इतर सुविधांसाठी पुरेशी व्यवस्था केली नव्हती आणि परवान्याच्या अटींचे पालन केले नव्हते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech