bank of maharashtra

भारत रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवणार

0

ट्रम्पच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आश्वासन दिले आहे की भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज, गुरुवारी देशहितासाठी रशियाकडून तेल आयात सुरूच राहिल असे संकेत दिलेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी एका निवेदनात सांगितले की, भारत हा तेल आणि वायूचा मोठा आयातदार आहे. बदलत्या ऊर्जा बाजारात भारतीय ग्राहकांच्या हितांचे रक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. आमची आयात धोरण ह्याच उद्देशाने मार्गदर्शित होते.आमच्या ऊर्जा धोरणाचे 2 मुख्य उद्दिष्टे आहेत स्थिर दरात ऊर्जा उपलब्ध करणे आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे. यामध्ये विविध स्रोतांमधून तेल व वायू मिळवणे आणि बाजारातील परिस्थितीनुसार पुरवठा व्यवस्थापन करणे यांचा समावेश आहे. आम्ही अनेक वर्षांपासून आमचा ऊर्जा खरेदीचा विस्तार करत आहोत. मागील दशकात यामध्ये सातत्याने प्रगती झाली आहे. सध्याच्या अमेरिकन प्रशासनाने भारतासोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्यात रस दाखवला आहे आणि यासंदर्भात चर्चा सुरू आहे असेही निवेदनात म्हंटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की पंतप्रधान मोदींनी त्यांना खात्री दिली आहे की भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. जेव्हापासून युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे, तेव्हापासून अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देश भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर आक्षेप घेत आहेत.अलीकडच्या काळात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात भारताची भूमिका स्पष्ट करत सांगितले होते की, भारत फक्त आपल्या नागरिकांसाठी सर्वाधिक फायदेशीर करार करण्याचा प्रयत्न करत आहे. याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य देशांच्या दुहेरी भूमिकेवरही भाष्य करत सांगितले होते की, “युरोपच्या समस्या म्हणजे जगाच्या समस्या आहेत, पण जगाच्या समस्या युरोपच्या समस्या नाहीत” या विचारातून पाश्चिमात्यांनी बाहेर येणे गरजेचे आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech