bank of maharashtra

हिंद-प्रशांत सुरक्षेबाबत भारत आणि अमेरिका एकजूट

0

नवी दिल्ली : हिंद-प्रशांत प्रदेशात वाढत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका यांनी नौदल सहकार्य आणखी दृढ करण्यावर भर दिला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी अमेरिकेतील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत अनेक फेऱ्यांच्या चर्चा केल्या. समुद्री सुरक्षेपासून ते प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत विविध मुद्द्यांवर दोन्ही देशांनी भागीदारीला नवे उंचीवर नेण्याचा संकल्प पुन्हा व्यक्त केला.

पाच दिवसीय दौऱ्यात ॲडमिरल त्रिपाठी यांनी यूएस इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ॲडमिरल सॅम्युअल जे. पापारो, यूएस पॅसिफिक फ्लीटचे कमांडर ॲडमिरल स्टीफन टी. कोहलर आणि यूएस मरीन फोर्सेस पॅसिफिकचे कमांडर लेफ्टनंट जनरल जेम्स एफ. ग्लिन यांची भेट घेतली. या बैठकींमध्ये समुद्री क्षेत्रातील वाढत्या आव्हानांवर, संचालनात्मक समन्वयावर आणि इंटरऑपरेबिलिटी वाढवण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा झाली. माहिती-विनिमय आणि समुद्री क्षेत्रावरील जागरूकता अधिक प्रभावी करण्याबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

दोन्ही देशांनी इंडो-पॅसिफिक मेरीटाइम डोमेन अवेअरनेस उपक्रमाला भारताच्या इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर–इंडियन ओशन रिजन (आयएफसी-आयओआर ) सोबत अधिक परिणामकारकपणे जोडण्यावर सहमती दर्शवली. तसेच समुद्री व्यापारी मार्गांची आणि महत्त्वाच्या समुद्राखालील (अंडरसी) पायाभूत सुविधांची सुरक्षा मजबूत करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.

चर्चेदरम्यान मानवीय मदत, आपत्ती निवारण, शोध व बचाव मोहिमा आणि अँटी-पायरेसी कारवाईमध्ये सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. दोन्ही देशांनी मालाबार, PASSEX, मिलन आणि कॉम्बाइन्ड मेरीटाइम फोर्सेस यांसारखे संयुक्त लष्करी सराव अधिक प्रमाणात आयोजित करण्याचे मान्य केले, ज्यामुळे संयुक्त युद्धक क्षमता आणि लॉजिस्टिक समन्वय आणखी मजबूत होईल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech