मुंबई : देशात मान्सूनचे जोरदार आगमन सतत सुरू असून विविध राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीहून अधिक आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा, बिहार, महाराष्ट्र आणि दक्षिणेतील किनारपट्टी भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने अनेक भागांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. केरळमधील अलाप्पुझा येथील कार्तिकप्पल्ली येथे मुसळधार पावसामुळे एका सरकारी शाळेचे छत कोसळले. ही शाळा १५० वर्षांहून अधिक जुनी आहे. येथे १००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. रविवार सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारतीय हवाई दलाने लेहच्या नुब्रा खोऱ्यात अडकलेल्या २१ नागरिकांना वाचवले. त्यापैकी ५ महिला होत्या. पूर, पाऊस आणि भूस्खलनामुळे हे सर्व नागरिक येथे अडकले होते.
मुंबईत पाणी तुंबले, अंधेरी सबवे बंद करण्यात आला होता. जोरदार पावसामुळे अंधेरी रेल्वे स्थानक आणि सबवे परिसरात पाणी साचले. अनेक उपनगरीय भागात जोरदार पाऊस झाला त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक दुकांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून निचऱ्याचे काम सुरू आहे. प्रदेशात ६६ टक्क्यांनी जास्त पाऊस झाला आहे . यावर्षीच्या मान्सून हंगामात आतापर्यंत ५२० मिमी (२०.५ इंच) पावसाची नोंद झाली आहे, जे अपेक्षित सरासरीपेक्षा ८.२ इंचांनी अधिक आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरलेला असून २१ आणि २२ जुलैला काही जिल्ह्यांत हलक्याच सरींचा अंदाज आहे.
राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा जोर मंदावला मंदावला असून गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला. मात्र रविवारी पावसाचा जोर कमी झाला असून जयपूर, अजमेर, टोंक, कोटा आणि भरतपूरसारख्या भागांत आकाश निरभ्र राहिले. बाडमेरमध्ये एका व्यापाऱ्याचा तलावात बुडून मृत्यू, तर सिरोहीमध्ये बनास नदीत दोन युवक बुडाल्याची दुःखद घटना घडली. छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस, पर्यटक वाहून गेले वाहून गेले आहेत . राज्यात यलो अलर्ट जारी असून बस्तर विभागात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. कवर्धा जिल्ह्यातील रानीधारा धबधब्याजवळ पाच पर्यटक पाण्यात वाहून गेले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे. डोंगरगड परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रेल्वे मार्गही बंद आहे.
उत्तर प्रदेश व बिहारमध्ये पूराचा धोका वाढला आहे . वाराणसीमध्ये गंगा नदीची पाणीपातळी वाढली असून निचांकी भागांमध्ये पूराचा धोका निर्माण झाला आहे. बिहारमध्ये २५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. अररिया व भागलपूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. कोसी, गंडक आणि सोन नद्यांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे १५ जिल्ह्यांत पूराचा इशारा आहे. हरियाणात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे .पंचकुला, अंबाला, यमुनानगरसह आठ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यमुनानगरमध्ये राज्यातील सर्वाधिक ४१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा धोका आहे. देहराडूनमध्ये हवामानात गारवा जाणवतो आहे. दिल्ली-एनसीआर आणि पूर्व भारतात अधूनमधून पावसाचा अंदाज आहे.
