bank of maharashtra

“वारीत शिरला वैचारिक नक्षलवाद, कारवाई व्हावी”- बंडा तात्या कराडकर

0

पुणे : पंढरपूरला जाणाऱ्या आषाढ वारीत वैचारिक नक्षलवादी (अर्बन नक्षल) शिरले आहेत. हो लोक वारीत घुसून बुद्धिभेद करत आहेत. सरकारने लवकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केलीय. समस्त वारकरी संस्था आणि संस्थान यांच्यावतीने आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत तात्यांनी ही मागणी केली.

यासंदर्भात कराडकर म्हणाले की, वारीत शिरून बुद्धीभेद करणाऱ्यांवर सरकारने तत्काळ प्रभावाने कारवाई करण्याची गरज आहे. जर सरकारने वेळीच कारवाई केली नाही तर आम्ही तरुण वारकऱ्यांचा गट तयार केला असून ते या वैचारिक नक्षलवाद्यांना जाब विचारतील. त्यावेळी संघर्ष निर्माण झाल्यास ती सरकारची जबाबदारी राहिल असा इशारा ह.भ.प. बंडातात्यांनी दिला आहे.

कबीर कला मंच यांना सरकारने रोखले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वारीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय काम करत आहे ? असा सवालही त्यांनी केला.

काही पुरोगामी संघटना पालखी सोहळ्यात येतात आणि अपप्रचार करतात. संताचे दाखले अर्धवट दिले जात आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. वारकरी संप्रदाय सगळ्यात मोठा आहे. त्यांची संघशक्ती मोठी आहे. वाघाचे कातडी पाखरून वाघ होता येत नाही. पण असेच काहीजण काम करत आहेत. काहीजण वारकरी गर्दीचा फायदा घेऊन आपले खोट नाणे चालवत आहेत. वारकरी मुळावर घाला घालीत आहेत. आम्ही कुणाचा द्वेष करत नाहीत. पण मुळावर घाव घालत असाल तर हे लोकांना सांगितले पाहिजे, असे बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech