bank of maharashtra

होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची परवानगी; ‘आयएमए’, ‘मार्ड’ आक्रमक

0

मुंबई : सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची औषधे वापरण्याची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि ‘मार्ड’ने गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. खासगी रुग्णालयांच्या ओपीडी सेवा बंद असल्याने रुग्णांना उपचारासाठी मोठी धावपळ करावी लागली. यातच मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टर व इंटर्न संपावर गेल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली.

महाराष्ट्र सरकारने ‘सीसीएमपी’ हा कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे, ज्याला ‘आयएमए’ सुरुवातीपासूनच विरोध करत आहे. या आंदोलनात आता सेंट्रल ‘मार्ड’सह ‘एफएआयएमए’, ‘एमएसआरडीए’, ‘एएसएमआय’ आदी संघटनांही पुढे आल्या आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर दरम्यान ‘आयएमए’ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी यांच्या नेतृत्वात नागपूर ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. राजेश सावरबांधे, सचिव डॉ. जितेंद्र साहू, पुढील वर्षीचे अध्यक्ष सचिन गाठे, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. आशिष दिसावल, डॉ. बी. के. शर्मा, डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. अर्चना कोठारी व ‘मार्ड’च्या सदस्यांनी ‘आयएमए’ सभागृहात बैठक घेऊन शासन निर्णयाचा निषेध नोंदविला.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech