bank of maharashtra

मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘ज्ञानोत्सवास’ माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती

0

लोकनायकाचा वाढदिवस हजारो ग्रंथभेटीने सुफळ संपूर्ण

वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छारुपी ज्ञानोत्सवात मिळालेले ग्रंथ जिल्ह्यातील वाचनालयांना देणार

मंत्री छगन भुजबळ यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन

नाशिक : राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ज्ञानोत्सवास राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी उपस्थिती लावत मंत्री छगन भुजबळ यांचे अभीष्टचिंतन केले. या ज्ञानाच्या भेटीच्या उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतकांकडून हजारोंच्या संख्येने पुस्तके भेट स्वरूपात मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आली.त्यामुळे यंदाचा त्यांचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न राहता ज्ञान आणि संस्कारांचा उत्सव ठरला.

मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा म्हणून फुले, गुच्छ व इतर भेट वस्तू न देता पुस्तके द्यावीत असे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनास राज्यभरातील हितचिंतकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे आजचा हा ज्ञानोत्सव अतिशय अविस्मरणीय ठरला. नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्यभरातील हितचिंतकानी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देखील मदत सुपूर्त करण्यात आली.

यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार प्रकाश सुर्वे,आमदार हिरामण खोसकर,आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार वसंत गिते, सुधीर तांबे, माजी महापौर विनायक पांडे, अशोक मुर्तडक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, ईश्वर बाळबुधे, अंबादास बनकर, आगरी समाजाचे अध्यक्ष राजाराम पाटील, डॉ.कैलास कमोद, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, पंढरीनाथ थोरे, आनंद सोनवणे,अरुण थोरात, प्रा.दिवाकर गमे, बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, विष्णूपंत म्हैसधुणे, नाशिक म्हाडाचे विभागीय अध्यक्ष तथा शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अजिंक्य वाघ, नानासाहेब महाले, राजेंद्र डोखळे,वसंत पवार, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, जगदीश पवार, मंजिरी धाडगे, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, गोरख बोडके, सुनील मोरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, मनोज घोडके, डॉ.योगेश गोसावी, संजय करंजकर, राजेंद्र शिंदे, उदय जाधव, प्रा.बाळासाहेब पिंगळे, योगेश निसाळ, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मोहन शेलार, डॉ.नागेश गवळी, प्रा.अर्जुन कोकाटे, वसंत खैरनार, प्रित्येश गवळी, पंढरीनाथ बनकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने विविध विषयांवरील पुस्तके शुभेच्छा रुपी मिळाली.त्यातून एक समृद्ध साहित्य संग्रह तयार झाला. तो संग्रह पुढे वाचनालयांना भेट देण्यात आला ही कृती म्हणजे ज्ञानदानाच्या संस्कृतीचा सुंदर नमुना ठरली आहे. या साहित्य संपदेतून ग्रामीण तरुणाईला, विद्यार्थी वर्गाला आणि वाचनप्रिय समाजघटकांना त्यामुळे ज्ञानाचे नवे दरवाजे उघडतील.आजच्या काळात मोबाईलच्या पडद्यावर अडकलेले मन पुन्हा एकदा पुस्तकांच्या पानांकडे वळावे, वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन घडावे हाच या उपक्रमामागचा खरा हेतू आहे.

वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू मंत्री छगन भुजबळ यांनी वाढदिवसाशी जोडला आहे. तो समाजात एक प्रेरणादायी आदर्श ठरेल.त्यांचे संपूर्ण आयुष्य हे सदैव “समाजासाठी काहीतरी देण्याच्या” वृत्तीने प्रेरित राहिले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हीच भावना पुस्तकांच्या रूपाने ते जनतेपर्यंत पोहोचत आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य लोणारी समाजाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सुदर्शन घेरडे यांच्या कडून १०० किलो वजनाच्या पुस्तकांची भेट देण्यात आली.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech