bank of maharashtra

राज्यात आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण

0

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत विकसित ऑनलाईन पोर्टलद्वारे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. राज्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ३ लाख ४१ हजार ९७३ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असल्याची माहिती ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.

या प्रक्रियेला अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, इमाव व विमाप्र (जात प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० व नियम २०१२ अंतर्गत अर्जदारांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. समित्या आवश्यक कागदपत्रांची छाननी करून त्रुटी असल्यास मार्गदर्शन करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या माध्यमातून विकसित केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. यात अर्ज सादर करणे, ट्रॅक करणे, त्रुटींची ऑनलाईन पूर्तता, सेवा शुल्क भरणे, डिजीलॉकर व ई-मेलद्वारे प्रमाणपत्र मिळविणे, सचित्र मार्गदर्शन आणि २४x७ हेल्पलाईन यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. राज्यातील ३६ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक म्हणून बार्टीचे महासंचालक कार्यरत असून, अनुसूचित जमाती वगळता इतर सर्व जातींच्या जात पडताळणीची जबाबदारी या समित्यांकडे आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech