bank of maharashtra

धर्मेंद्रजींचे निधन म्हणजे भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत- पंतप्रधान मोदी

0

नवी दिल्ली : धर्मेंद्रजींचे निधन म्हणजे भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत आहे”, अश्या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्स वर पोस्टमध्ये लिहिले “धर्मेंद्रजींचे निधन म्हणजे भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत आहे. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्त्व, अद्वितीय अभिनेते होते, ज्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत आकर्षण आणि खोली आणली. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. धर्मेंद्रजी त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि आपुलकीसाठीही तितक्याच प्रमाणात प्रशंसनीय होते. या दुःखद क्षणी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम् शांती.”

धर्मेंद्र यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्सवर लिहिले,“ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्रजींचे निधन हे भारतीय सिनेमासाठी एक अपूरणीय नुकसान आहे. ते अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांच्या अनेक दशकांच्या सुवर्णकारकिर्दीत त्यांनी असंख्य अविस्मरणीय भूमिका साकारल्या. भारतीय सिनेमातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी अशी परंपरा मागे ठेवली आहे, जी येणाऱ्या पिढ्यांच्या कलाकारांना प्रेरित करत राहील. त्यांच्या परिवार, मित्र आणि असंख्य चाहत्यांप्रती माझ्या हार्दिक संवेदना.”

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी लिहिले —“प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन हे भारतीय सिनेमा आणि कला क्षेत्रासाठी अपूरणीय नुकसान आहे. आपल्या प्रभावी अभिनयाने त्यांनी सिनेमाप्रेमींच्या मनावर अमिट छाप सोडली. आपल्या साधेपणा आणि जिवंत अभिनयाने त्यांनी देश-विदेशातील कला रसिकांच्या हृदयावर अनेक दशकं अधिराज्य केले. या कठीण वेळी त्यांच्या दुःखी परिवारास आणि चाहत्यांना माझ्या गहन संवेदना. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो आणि शोकाकुल परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.”

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी एक्सवर लिहिले —“भारतीय चित्रपटसृष्टीने आज एक अनमोल तारा गमावला. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आता आपल्या सोबत नाहीत. २०१२ मध्ये पद्मभूषण सन्मानाने गौरवले गेलेले धर्मेंद्र यांनी अनेक दशकं आपल्या अद्वितीय अभिनयाने आणि साध्या, सुसंस्कृत जीवनशैलीने चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. त्यांचे निधन म्हणजे एका युगाचा अंत आहे. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या परिवारास आणि कोट्यवधी चाहत्यांना मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “धर्मेंद्र फक्त उत्तम अभिनेते नव्हते, तर अतिशय चांगले आणि साधे-सरळ माणूस होते. माझा त्यांच्याशी वैयक्तिक परिचय होता. ते देश आणि शेतकऱ्यांविषयी अतिशय कटिबद्ध होते. त्यांच्या चित्रपटातील कामगिरीला कधी विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने फिल्म इंडस्ट्रीला मोठे नुकसान झाले आहे. भगवान त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ते माझ्या भेटीस येत असत. त्यांच्या कुटुंबाशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत.”

ते पुढे म्हणाले, “माझ्या धर्मेंद्रजींसोबत अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. त्यांच्या मुलांशीही माझे चांगले संबंध आहेत आणि हेमा मालिनीजींसोबत तर आमचा कौटुंबिक संबंध आहे. ते असे व्यक्तिमत्त्व होते जे नेहमी इतरांना मदत करत. जसे आपण म्हणतो, ‘पोस्टमॅन स्पिरिट’ त्यांच्या आयुष्याचे खरे चित्रण करते. त्यांच्या जाण्याने आपण एक अतिशय महान आणि माणुसकीचा आदर्श असलेला व्यक्ती गमावला आहे.”

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech