पाटणा : राहुल गांधी यांचे नेतृत्वाखालील दरभंगा येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या आईसाठी अपमानास्पद भाषाचा वापर करण्यात आल्याने भाजप नेत्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या घटनेच्या विरोधार्थ एनडीएने गुरुवारी (४ सप्टेंबर) ‘बिहार बंद’ करण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी सामील होण्याचे आवाहन केले आहे. हा बंद सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंतच राहील, जेणेकरून सामान्य जनतेला कमीत कमी त्रास होईल.या बंदाचे नेतृत्व एनडीए महिला मोर्चा करणार असून, आरजेडी -काँग्रेसच्या मंचावर केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात,तसेच पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईविरुद्ध केलेल्या टिप्पणी विरोधातही नाट्यमय विरोधप्रदर्शन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी ऑनलाइन माध्यमातून बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ लिमिटेड चे उद्घाटन केले.यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दिवंगत आईविरुद्ध केलेल्या अपमानजनक टिप्पण्यांना उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झाले आणि बिहारच्या महिलांना संबोधित करत म्हणाले,“ बिहारमधील आरजेडी-काँग्रेसच्या मंचावरून त्यांच्या आईला शिव्या घालण्यात आल्या, जे केवळ त्यांच्या आईचा अपमान नाही, तर संपूर्ण देशातील मातां-बहीणीं आणि मुलींचा अपमान आहे.”
ते पुढे म्हणाले, “तुम्हा सर्वांना माहिती आहे की आता माझ्या आईचे शरीर या जगात नाही. काही काळापूर्वी त्यांनी १०० वर्षांचे आयुष्य पूर्ण करून आम्हा सर्वांना सोडून दिले. माझ्या त्या आईचा, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता, ज्या आता हयातही नाहीत… माझ्या त्या आईला आरजेडी-काँग्रेसच्या मंचावरून अश्लील, घाणेरड्या शिव्या दिल्या गेल्या. हे अत्यंत दु:खदायक, वेदनादायक आणि त्रासदायक आहे. त्या आईचा काय गुन्हा होता, जो तिला अशा अपमानास्पद शिव्या ऐकाव्या लागल्या?”इतके चित्रण पाहता, या घटनेने पंतप्रधान मोदींच्या भावनिक संरचनेला स्पर्श केला आहे, आणि त्यांनी भाविक भाषणातून विशेषतः मातृ सन्मानाचा आणि बिहारमधील संस्कारांचा रक्षण या मूळ तत्त्वांवर भर दिला आहे.