bank of maharashtra

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ५१.५० रुपयांनी स्वस्त

0

नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (१९ किलो) किंमतीत ५१.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. नवीन किंमती आज, १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करतात आणि सुधारीत दर जाहीर करतात.

नव्या दरानुसार नवी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १६३१.५० वरून १५८० रुपयांवर आली आहे. याशिवाय, कोलकातामध्ये ते १७३४.५० रुपयांना उपलब्ध होते, जे आता १६८४ रुपयांना उपलब्ध होईल. मुंबईतही त्याची किंमत १५८२.५० रुपयांवरून १५३१.५० रुपयांवर आली आहे, तर चेन्नईमध्ये सिलिंडरची किंमत १७८९ रुपयांवरून १७३८ रुपयांवर आली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मते, आता १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर दिल्लीत १,५८० रुपयांना उपलब्ध होईल. यापूर्वी १ जुलै रोजी कंपन्यांनी ५८.५० रुपयांनी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला ३३.५० रुपयांनी कमी केला होता. म्हणजेच गेल्या काही महिन्यांत सतत किमती कमी केल्या जात आहेत. जूनमध्ये ही किंमत १७२३.५० रुपये होती, तर एप्रिलमध्ये ती १७६२ रुपये होती. फेब्रुवारीमध्ये ७ रुपयांची थोडीशी सवलत मिळाली होती, परंतु मार्चमध्ये पुन्हा ६ रुपयांची वाढ झाली.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech