bank of maharashtra

जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही – फडणवीस

0

लातूर : जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद करणार नाही व एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उदगीरच्या प्रचार सभेत केली आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा, माजी मंत्री निलंग्याचे आमदार संभाजी पाटील, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड औशाचे आमदार अभिमन्यू पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर, माजी खासदार सुधाकर शृंगारे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याच्या अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही शिवाय महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे. त्यासाठी नगरपालिका आमच्या ताब्यात द्या आम्ही शहराचा विकास करू असे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूर जिल्ह्यातील नगर परिषदांचे व नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ‘जाहीर सभा’ उदगीर येथे आज झाली. स्वाती हुडे – नगराध्यक्ष उमेदवार – उदगीर नगर परिषद, डॉ. ज्योती बनसुडे – नगराध्यक्ष उमेदवार – औसा नगर परिषद, ॲड. स्वप्निल व्हत्ते – नगराध्यक्ष उमेदवार – अहमदपूर नगर परिषद, संजय हलगरकर – नगराध्यक्ष उमेदवार – निलंगा नगर परिषद, शोभा अकनगिरे – नगराध्यक्ष उमेदवार – रेणापूर नगर पंचायत, यावेळी आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech