नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती व भाजप या दोघांच्याही बाबतीत १०० प्लसचा नारा आमचा कायम आहे आणि येणाऱ्या निवडणुकींमध्ये महायुतीचा विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्र भाजपच्या बैठकीसाठी आलेले होते. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पक्षाचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रावल, यांच्यासह अन्य मंत्री व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे राज्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक सह धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर या जिल्ह्यातील पक्षातील आमदारांशी आणि खासदारांशी वन टू वन चर्चा केली. पदाधिकाऱ्यांची चर्चा करून सध्याची काय परिस्थिती आहे काय केलं पाहिजे या सर्व विषयावरती चर्चा केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पक्षाच्या एकूणच कामकाजाचा आढावा विभाग स्तरावरती घेतला जात आहे.विभाग स्तरावरती जाऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह सर्व महत्वपूर्ण पदाधिकारी मी स्वतः तसेच मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आधी सर्वजण जाऊन चर्चा करत आहोत.एकूणच परिस्थितीची माहिती घेत आहोत असे स्पष्ट करून ते म्हणाले की होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यापूर्वी उत्तर महाराष्ट्र मध्ये भाजपाची परिस्थिती भक्कम होती आणि हो घडलेल्या निवडणुकांमध्ये देखील त्याहीपेक्षा अधिक भक्कम परिस्थिती होईल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस पुढे म्हणाले की, भाजपाचा शंभर प्लसचा नारा हा एकट्यासाठी नाही तर हा महायुतीसाठी आहे .महायुती मध्ये आम्ही ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे त्या ठिकाणी भाजप स्वतंत्र लढेल आणि ज्या ठिकाणी तुल्यबळ लढत असेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल.
काही ठिकाणी महायुती म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ पण आमचं १०० प्लसचा उद्दिष्ट हे कायम आहे मग ती महायुती म्हणून असो किंवा भाजपा म्हणून असो आम्ही एकत्रित किंवा वेगवेगळे शंभर प्लस पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील घायवळ प्रकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की एका सुनावणी प्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती त्यावेळी परवानगी दिलेली नाही.या सर्व प्रकरणाबाबत जर परवाना दिला गेला असता तर विरोधकांचे आरोप मान्य होते पण पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी या सर्व प्रकरणात जे काही घडलं जे काही घडत होतं. याबाबत माहिती समोर आणली त्यामुळे घायवळ यांना परवाना दिला नाही असेही त्यांनी सांगितले
सीबीआयचा अहवाल अजून पर्यंत आलेला नाही तो अहवाल आल्यानंतर त्या प्रकरणांमध्ये राज्य सरकार निश्चितच कारवाई करेल कोणाचीही गय केली जाणार नाही. असे स्पष्ट करताना नासिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत बोलताना फडणवीस म्हणाले की आम्ही पोलिस आयुक्तांना पूर्णपणे फ्रीहँड दिलेला आहे.कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी असो त्याच्यावरती कारवाई केली जाईल राजाश्रय कुठलाही पक्षाने देऊ नये ते सर्वच पक्षांना आवाहन करताना पुढे म्हणाले की या सर्व प्रकरणात आता गुन्हेगारी कदापि खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.