bank of maharashtra

बिहार निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात विक्रमी ६८.७९ टक्के मतदान

0

पाटणा : बिहारच्या २० जिल्यांमधील १२२ विधानसभा मतदारसंघांमध्ये आज, मंगळवारी मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच मतदारांनी सर्व विक्रम मोडले होते. मतदान संपल्यानंतर एकूण मतदान सुमारे ६८.७९ टक्के नोंदवण्यात आले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठई दुसऱ्या टप्प्यात १२२ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६८ टक्के लोकांनी मतदान केले असून हा आकडा ७० टक्क्यांहून अधिक जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या गया, कैमूर, रोहतास, औरंगाबाद, अरवल, जहानाबाद, नवादा, भागलपूर, बांका, जमुई, सीतामढी, शिवहर, मधुबनी, सुपौल, पूर्णिया, अररिया, कटिहार, किशनगंज, पूर्वी चंपारण आणि पश्चिमी चंपारण या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, एकूण १,३०२ उमेदवार मैदानात होते, ज्यामध्ये १,१६५ पुरुष, १३६ महिला आणि एक ट्रान्सजेंडर उमेदवार होते. दुसऱ्या टप्प्याचे मतदान संपताच एक्झिट पोलचे निकाल समोर येऊ लागले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आहे. याआधी सर्वाधिक मतदान २००० च्या विधानसभा निवडणुकीत ६२.५७ टक्के झाले होते.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदाना कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८०.८९ टक्के मतदान झाले, तर नवादा मतदारसंघात सर्वात कमी ५४.८३ टक्के मतदान नोंदले गेले. दुसऱ्या टप्प्याचे मतदान आता पूर्ण झाले आहे. संवेदनशील घोषित केलेल्या बूथांवर मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंतच संपविण्यात आले होते, तर उर्वरित बूथवर ६ वाजेपर्यंत मतदान चालले. तथापि, ज्या केंद्रांवर मतदान उशिरा सुरू झाले आणि सहा वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते, तेथे मतदान सुरूच आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाने पहिल्या टप्प्याचाही विक्रम मोडला आहे. त्या वेळेपर्यंत ६७.१४ टक्के मतदान झाले होते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech