bank of maharashtra

तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे मुंबईला जाणाऱ्या विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग

0

नवी दिल्ली : तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या एका विमानाला आज आपली नियोजित उड्डाणयात्रा मध्येच थांबवून दिल्लीला परतावे लागले. दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या AI ८८७ या फ्लाइटला टेकऑफनंतर काही वेळातच तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला, त्यामुळे विमानाला सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर परत उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना एअर इंडियाने स्पष्ट केले की प्रवाशांची सुरक्षितता हीच कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. माहितीनुसार, टेकऑफनंतर काही वेळात तांत्रिक बिघाड आढळल्याने फ्लाइट AI 887 ला परत दिल्लीला आणण्यात आले. विमानाची दिल्लीमध्ये सुरक्षित लँडिंग करण्यात आली असून सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या AI ८८७ या विमानात टेकऑफनंतर तांत्रिक अडचण निर्माण झाली. मानक कार्यपद्धतीनुसार (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) विमानाला दिल्ली विमानतळावर परत उतरवण्यात आले. सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले असून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे. या घटनेत सर्व प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech