bank of maharashtra

अहमदाबाद विमान अपघातात इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही – एअर इंडिया

0

नवी दिल्ली : मागील महिन्यात एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये मोठा अपघात झाला.या एअर इंडिया विमान अपघाताबाबत एएआयबीचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला, यामध्ये इंधन नियंत्रण स्विचमध्ये समस्या असल्याचे समोर आले. यानंतर एअर इंडियाने त्यांच्या सर्व बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर्सच्या इंधन स्विचची तपासणी केली, ज्यामध्ये कोणतीही समस्या आढळली नसल्याची माहिती एअर इंडियाने दिली. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत एएआयबीचा प्राथमिक तपास अहवाल समोर आल्यानंतर, डीजीसीएने सर्व नोंदणीकृत विमानांमधील इंधन स्विचची तपासणी अनिवार्य करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी(दि. १४) डीजिसीएने विमान कंपन्यांना बोईंग ७८७ आणि ७३७ विमानांमधील ‘फ्युएल स्विच लॉकिंग’ सिस्टम तपासण्यास सांगितले होते. ‘गेल्या महिन्यात अपघातापूर्वी एअर इंडियाच्या विमानात इंधन स्विच बंद होते, असं एएआयबीच्या प्राथमिक चौकशी अहवालात आढळून आले.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने वैमानिकांना पाठवलेल्या अंतर्गत संदेशाचा हवाला देत सांगितले की, “आमच्या अभियांत्रिकी पथकाने आमच्या सर्व बोईंग ७८७ विमानांच्या इंधन नियंत्रण स्विचला लॉक करण्याच्या यंत्रणेची खबरदारीची तपासणी सुरू केली होती. तपासणी पूर्ण झाली आहे आणि कोणतीही समस्या आढळली नाही.” सर्व बोईंग ७८७-८ विमानांमध्ये थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल स्वीकारण्यात आला आहे. इंधन नियंत्रण स्विच या मॉड्यूलचा एक भाग आहे. इंधन नियंत्रण स्विच विमानाच्या इंजिनमधील इंधनाचा प्रवाह नियंत्रित करतो. यापूर्वी, एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ विमानाच्या अपघातानंतर एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने शनिवारी आपला प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. एएआयबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एअर इंडियाच्या AI-१७१ च्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा करणारे स्विच टेकऑफच्या काही सेकंदातच बंद झाले होते, यामुळे ते लगेचच क्रॅश झाले. ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग’मध्ये एका पायलटने दुसऱ्याला इंधन का बंद केले असे विचारल्याचे ऐकू आले,असंही अहवालात म्हटले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech