bank of maharashtra

कुख्यात हिडमा मडावीसह ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

0

रायपूर : छत्तीसगढ-आंध्र प्रदेश सीमेवर आज, मंगळवारी सकाळी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिडमा मडावी, त्याची पत्नी राजे यांच्याह ६ नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांचा नाश करण्यासाठी राज्य पोलिस आणि सुरक्षा दलांच्या जवानांचे एंटी नक्षल ऑपरेशन सुरू आहे. छत्तीसगढ-आंध्र प्रदेश सीमा भागात झालेल्या चकमकीत हिडमा मारा गेला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज, मंगळवारी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सीताराम राजू (एएसआर) जिल्ह्यातील रामपचोदवरम उप-मंडळातील मारेदुमिल्लीजवळ सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात ६ नक्षलवादी ठार झाले.

यामध्ये नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला हिडमा मडावी, मदगाम राजे (हिडमाची पत्नी), लकमल, कमलू, मल्ला आणि हिडमाचा अंगरक्षक देवे यांचा समावेश आहे. घटनास्थळाहून २ एके-४७ रायफल्स, एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. हिडमाच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्च अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी ३० नोव्हेंबर २०२५ च्या निर्धारित वेळेपूर्वीच हिडमाचा खात्मा केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या महत्त्वपूर्ण यशाबद्दल समाधान व्यक्त केले आणि या अभियानात सहभागी सर्व अधिकाऱ्यांना व जवानांचे कौतुक केले आहे.. त्यांनी उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पुढील धोरणावर चर्चा केली. या बैठकीचे मुख्य उद्दीष्ट हे होते की, हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी संघटनेत कोणतेही नवीन नेतृत्व उभे राहू नये आणि त्यांच्या क्रियाकलापांवर कडक नियंत्रण ठेवता येईल.

हिडमाचे नाव प्रदीर्घ काळापासून नक्षली हिंसेशी जोडले गेले होते. सुरक्षा दलांवर केलेल्या अनेक मोठ्या आणि घातक हल्ल्यांचे मास्टरमाइंड म्हणून त्याला ओळखले जात होते. त्याची अटक किंवा निष्क्रीयता सुरक्षा संस्थांसाठी महत्त्वाचा उद्देश होता. सुरक्षा दलांनी एक जटिल आणि आव्हानात्मक मोहिम राबवत हिडमाला निष्क्रिय करण्यात यश मिळवले आहे. हे यश केवळ गुप्त माहितीच्या प्रभावी वापराचे उदाहरण नाही, तर भूमिकेवर तैनात जवानांच्या धैर्य आणि ठाम निर्धाराचाही परिणाम आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech