bank of maharashtra

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

0

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. युद्धविराम झाल्यानंतर इराणने भारताचे आभार मानले आहेत. इस्रायलसोबत झालेल्या युद्धादरम्यान भारताकडून समर्थन मिळाले होते. नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये इराणने भारताचे आभार मानले आहेत. सोबतच या पोस्टमध्ये इराण आणि भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध क्षेत्रातील भागीदारीचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. अमेरिका आणि इस्रायलसारख्या राष्ट्रांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचा विजय झाला आहे. हा एक ऐतिहासिक असा विजय आहे. त्यासाठी इराणचा दूतावास भारतातील सर्व महान आणि स्वतंत्रताप्रेमी नागरिक, राजकीय पक्ष, संसदेतील सर्व सदस्य, धार्मिक आणि आध्यात्मिक गुरू, सामाजिक कार्यकर्ता आणि भारतीय मीडियाचे आम्ही आभारी आहोत, जे युद्धासारख्या कठीण प्रसंगात आमच्यासोबत उभे राहिले.

इराणने भारताचे आभार मानताना म्हटलं आहे की, भारतासारख्या महान राष्ट्रातील लोकांनी आणि संस्थांनी आम्हाला दिलेल्या खऱ्या आणि अमूल्य पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून कौतुक करतो, निःसंशयपणे यामुळे आपल्या दोन्ही देशांमधील दीर्घकालीन सांस्कृतिक, आणि मानवतावादी संबंधांना चालना मिळणार आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, इराणच्या अनेक महत्त्वाच्या संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक महत्त्वाची विमानतळं आणि पायाभूत सुविधा बेचिराख झाल्या आहेत. अमेरिकेकडून इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये इराणच्या या अणुऊर्जा केंद्रांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर इस्रायलचे देखील मोठं नुकसान झालं आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech