श्रीनगर : बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) ने जम्मूच्या सुचेतगड येथे सीमेजवळून एका पाकिस्तानी नागरिकाला भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना अटक केली आहे. बीएसएफ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा व्यक्ती भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. बीएसएफने त्याला थांबण्यासाठी सांगितले, पण तो न थांबता पुढे जात राहिला, त्यामुळे अधिकार्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपीला अटक करून सध्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.घुसखोरीच्या आरोपीची ओळख सिराज खान अशी झाली असून, तो पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचा रहिवासी आहे. सिराजच्या जवळून बीएसएफला पाकिस्तानी चलनही सापडले आहे.
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सांबा सेक्टरमध्ये देखील बीएसएफ च्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार मारले होते. बीएसएफ सूत्रांनी सांगितले होते की ही घटना सांबा जिल्ह्यातील रीगल भागात सीमेवरील एका चौकीजवळ घडली होती. एका सूत्राने सांगितले होते की, घुसखोर सीमा कुंपणाजवळून भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत असताना त्याला गोळ्या घालण्यात आल्या. सदर घुसखोराची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.