bank of maharashtra

अशोक खरात प्रकरणाची सुनावणी; न्यायालयीन कोठडी कायम

0

नाशिक : महिलांचे शोषण आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज, बुधवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच, आरोपीला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले.

सरकारी वकील शैलेंद्र बागडे, आरोपीचे वकील सचिन भाटे आणि प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी हे यावेळी न्यायालयात उपस्थित होते. सुनावणी न्यायमूर्ती श्रीमती बी. एन. ईचपुराणी यांच्या न्यायालयात झाली. दरम्यान, दुसऱ्या गुन्ह्यात कोठडी मिळाल्यामुळे अशोक खरात याला मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी एसआयटी (SIT) कडून पुन्हा आरोपीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरात याला कारागृहात दाखल करणे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम आजच पार पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech