bank of maharashtra

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात १२ एप्रिल रोजी ‘कोकणची लोकधारा’

0

ठाणे : कोकणची संस्कृती, परंपरा यांचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे, या उद्देशाने बारटक्के फाऊंडेशन प्रस्तुत, सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ, ठाणे आणि जनार्दन सीताराम घुगरे स्मृती वृद्धाश्रम, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात पहिल्यांदाच ‘कोकणची लोकधारा…. प्रथा… परंपरेचा मानबिंदू…!’ हा कलाविष्कार रविवार, १२ एप्रिल रोजी सादर होणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक तथा बारटक्के फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप बारटक्के यांनी दिली आहे.

याप्रसंगी व्ही. सी. म्हात्रे (डी. जी.एम., ओ.एन.जी.सी., भारत) यांना जीवन गौरव पुरस्कार २०२६, कमलेश प्रधान (अध्यक्ष, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय), सचिन मोरे (अध्यक्ष, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, ठाणे), अतुल वालावलकर (संचालक, डॉक्टर प्लॅनेट), डॉ. शंकर (राज) परब (अध्यक्ष, संकल्प इंग्लिश स्कूल, ठाणे) यांना कोकण भूषण पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात येणार आहे. तर सौरव गुप्ता (क्षेत्रीय संचालक, के आयएमएस) यांना विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी सेलिब्रेटींचे विशेष आकर्षण असणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून सूत्रसंचालन जानवी सावंत करणार आहेत. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

असे आहेत नृत्य प्रकार : कोकणातील बारा पाचाचे गाऱ्हाणे ( सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ, ठाणे), लग्न गीत नृत्य आणि तुळशी विवाह ( स्वा. सावरकर कला मंच, ठाणे), कुणबी नृत्य (जल्लोष ग्रुप, लोककला अभ्यासक पंकज पाडाळे), संकासूर आणि पालखी (तिरवडे तर्फे खारेपाटण – वैभववाडी, श्री. सखाराम घुगरे आणि ग्रुप), नमन ( मुद्रा आर्ट अकादमी, ठाणे : अध्यक्ष – माया सावंत), आदिवासी तारपा नृत्य (सुलोचना बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अध्यक्ष – नताशा सोनकर), बाल्या नृत्य (एफ टी एफ डान्स ग्रुप, विकास बोहित), मंगळागौर नृत्य (मैत्रीण गट: स्नेहा रवंदे, रागिणी साने, अंजली निकम, अमित शेलार), दशावतार ( मुंबई दशावतार कंपनी, गौतम कदम, गणेश मुणगेकर), कोकण महोत्सव गीत नृत्य( स्वा. सावरकर कला मंच, विद्या डान्स अकादमी)

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech