bank of maharashtra

कल्याण पश्चिमेत भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश

0

युती नको, मैत्रीपूर्वक लढू द्या – भाजपा कार्यकर्त्यांची मागणी

कल्याण : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या महायुतीत झालेल्या जागा वाटपाचा पार्श्वभूमीवर भाजपमधील असंतोष उफाळून येताना दिसत आहे. काल रात्री कल्याण पूर्वेत भाजपला ७ जागा देण्यात आल्याने पूर्वेतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालय बाहेर गोंधळ घालत घोषणाबाजी केली होती आता पूर्वेनंतर कल्याण पश्चिमेतही भाजपला फक्त ९ जागा दिल्याने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रस्त्यावर उतरले असून ‘युती नको’ अशा जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर अन्याय सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला आहे.

तर युती होऊ नये हि कार्यकर्त्यांची भावना आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पाडण्याचं काम शिवसेनेने केले. युतीत आमदार झाल्यावर भाजपा कार्यालयावर हल्ला करत, कार्यकर्त्यांना मारझोड केली. अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत काम करण्यासाठी भाजपाचा एकही कार्यकर्ता तयार नसल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार सांगितले. कल्याण पश्चिमेतील ३८ जागांपैकी केवळ ९ जागा या भाजपाला देण्यात आल्या आहेत. मात्र आम्ही ३८ जागा लढून या सर्व जागा जिंकणार एवढी ताकद भाजपाची तयार झाली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिममध्ये आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करण्याची परवानगी वरिष्ठ नेत्यांनी देण्याची मागणी यावेळी पवार यांनी केली.

युती झाल्याने गेली १० वर्षे जे जे कार्यकर्ते प्रभागात भाजपाचे काम करत आले आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असून इतर नगरपालिकांप्रमाणे मैत्रीपूर्ण लढत करावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांनी सांगितले. तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्ते महायुतीचे काम करत आले आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाचे काम केले नाही. कल्याण पश्चिमेत भाजपाला मानणारा वर्ग मोठा असल्याने पक्षाने आम्हाला मैत्रीपूर्ण लढण्याची परवानगी द्यावी अन्यथा स्वबळावर लढण्यासाठी भाजपा कार्यकर्ता सक्षम असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रीती दीक्षित यांनी दिली.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून महायुती कार्यकर्त्यांना मान्य नसून तरीदेखील महायुतीसाठी जो रेशो ठेवला आहे तो अत्यंत कमी असून भाजपा कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान करण्याची मागणी कल्याण शहर सरचिटणीस रवी गायकर यांनी केली. आज भाजपाजे चांगले दिवस आले आहेत ते कार्यकर्त्यांमुळे आले आहेत हे पक्षातील नेते, मंत्री यांनी हे लक्षात ठेवावे. मात्र दुधातून माशी काढतात तसे कार्यकर्त्याना बाजूला काढलं जात आहे. पक्षातील नेत्यांनी हे लक्षात ठेवावं त्यांचे आज जे अच्छे दिन आले आहेत ते भाजपा कार्यकर्त्यांमुळे आले असल्याची प्रतिक्रिया भाजप शहर सरचिटणीस साधना गायकर यांनी दिली.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech